भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मावळ तालुका यांच्यावतीने मुलांना शाळेचे गणवेश व शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप
स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून दुर्गम भागातील मालेवाडी , धालेवडी , निकम वाडी या जिल्हा परिषदेच्या तीन शाळेमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मावळ तालुका व कार्याध्यक्ष किरण जगताप , सरचिटणीस साहेबराव बोडके यांच्यावतीने मुलांना शाळेचे गणवेश व शालेय उपयोगी वस्तू शालेय बॅग वाटप करण्यात आले. ग्रामविकास अध्यक्ष निलेश ठाकर , उपाध्यक्ष आकाश साबळे ,लक्ष्मण निंबळे , उत्तर भारतीय आघाडीचे महासचिव निशित सिंग महिला आघाडीचे सरचिटणीस यमुना मरगळे अनिल साबळे, उपसरपंच राणीताई साबळे ,चेरमन संदीप दादा बोडके ज्ञानेश्वर साबळे , भरत साबळे, प्रशांत साबळे ,राहुल साबळे , अश्विनी खराडे ,सारिका निकम, ,लक्ष्मण मरगळे,धोंडिबा मरगळे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस आकाश साबळे व उपाध्यक्ष लक्ष्मण निंबळे यांनी केले होते