स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचच्या वतीने स्पर्श हॉस्पिटल मधील रुग्णांना रविंद्र भेगडे यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले.
सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या , रविंद्र भेगडे युवा मंच यांच्या वतीने सोमटणे येथील स्पर्श हॉस्पिटल येथे उपचाराधीन असलेल्या रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
तत्पूर्वी भाजप मावळ विधानसभेचे निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. रविंद्र भेगडे यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा प्रदान केल्या.
याप्रसंगी भाजपा मावळ तालुका वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ.अमितजी वाघ व स्पर्श हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर,नर्स,कर्मचारी उपस्थित होते!