पुणे ग्रामीण पोलीस दलाची दमदार कामगिरी
कामशेत पोलीसांकडुन ५६ लाख, ९२ हजार किंमतीचा गांजा जप्त.
दिनांक २२/०८/२०२४ रोजी सकाळी कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रविंद्र पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमी दारामार्फत ताजे ता. मावळगावचे हददीतून जुने हायवेरोडकडून ताजे गावाकडे जाणारे रोडमार्गे मळवली, लोणावळाकडे ४ इसम त्यांचे ताब्येतील सिल्हवर रंगाचे वेरना कारमधुन गांजांची वाहतुक करणार असलेची माहीती मिळालेने लागलीच त्यांनी मा. वरीष्ठांना मिळाले बातमीचा आशय सांगुन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, लोणावळा विभाग यांचे मार्गदर्शना प्रमाणे दोन पथके तयार करून पंचांचे उपस्थितीमध्ये सापळा लावला. त्यानंतर मिळाले बातमीप्रमाणे एक वेरना कार नंबर एम.एच/१४/जी. वाय/०५५० हि जुने हायवे रोडणे ताजे गावाकडे आलेली दिसली त्यावेळी सापळा कारवाईसाठी तयार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निरीक्षक रविंद्र पाटील यांनी दिले सुचने प्रमाणे छापा घालून कारची व डिकीची पाहणी केली असता डिकीमध्ये एकूण ९८ किलो वजनाचा गांजा हा आंमलीपदार्थ मिळून आला सदर कार मधील १) अभिषेक अनिल नागवडे, वय २४, २) प्रदिप नारायण नामदास, वय २५ वर्षे, ३) योगेश रमेशलगड, वय ३२ वर्षे, ४) वैभव संजीवण्न चेडे, वय २३ वर्षे, सर्व रा.पी.एम.टी. स्टॉप जवळील, मराठी शाळे जवळ, कारेगांवता. शिरूर जि.पुणे यांना गांजा बाळगले बददल ताब्येत घेवून छाप्यामध्ये मिळुन आलेला एकुण ९८ किलो वजनांचा गांजा एकूण ४८ लाख ५० हजार रूप्ये किंमतीचा गांजा तसेच ८ लाख रूपये किंमतीची वेरना कार, ४२ हजार रूपये किंमतीचे ३ मोबाईल हँडसेट असे एकूण ५६ लाख ९२ हजार रूपये किंमतीचा मुददेमाल मिळून आलेन तोपंचा समक्ष जप्त केला आहे. त्यावरून सदर इसमांवर कामशेत पोलीस स्टेशनला गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८ (क) २० (क) अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, श्री. पंकज देशमुख साो, अपर पोलीस अधिक्षक, श्री. रमेश चोपडे साो, सहा. पोलीस अधिक्षक श्री. सत्यसाई कार्तिक साो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र पाटील, तसेच पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहा. फौजदार नितेश कदम, पोलीस अंमलदर. रविंद्र रावळ, जितेंद्र दिक्षित, समिर करे, रविंद्र राय, गणेश तावरे, प्रतिक काळे, गणेश ठाकुर, शिवाजी टकले, सचिन निंबाळकर, पवन डोईफोडे, होमगार्ड सुशिल लोखंडे, रामदास पोटफोडे यांनी कारवाई केली.