मावळ तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी !!
तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या 14 वर्ष व 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धा बालविकास विद्यालय येथे पार पडल्या. 14 वर्ष वयोगटातील मुलींनी व्हॉलीबॉल स्पर्धेत कांतीलाल शहाच्या संघावर मात करत प्रथम स्थान पटकाविले.यात 14 वर्षे वयोगटातील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु.मानसी गाडे हीच उत्कृष्ट खेळाडू म्हणून पारितोषिक मिळाले. तसेच 17 वर्षे वयोगटातील मुलींनी बालविकासच्या संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकाविला.यावेळी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री.सचिन आंद्रे व क्रीडा शिक्षिका कु. रोहिणी बनसोडे उपस्थित होत्या . त्यांनी या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून सातत्याने सराव करून घेतला होता. या स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल शाळेचे क्रीडा शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक मा.श्री चंद्रकांत काकडे, अध्यक्ष श्री .संदीप काकडे. खजिनदार सौ.गौरी काकडे, मुख्याध्यापिका श्रीमती मीना अय्यर व पर्यवेक्षिका सौ. ज्योती सावंत, सौ.कीर्ती कुलकर्णी, सौ.अश्विनी भट ,व शाळेच्या सर्व शिक्षकांनी कौतुक केले.तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.