पवन मावळातील विद्यार्थिनींना गुड टच-बॅड टचचे प्रशिक्षण
रोटरी क्लब ऑफ मावळ आणि पुणे ग्रामीण दलाचे लोणावळा ग्रामीण पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पवन मावळातील इयत्ता पहिली ते बारावीतील विद्यार्थिनींसाठी गुड टच आणि बॅट टच विषयी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. बदलापूर अत्याचार घटनेमुळे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून मुलींमध्ये लैंगिक शोषणाबाबत जागरूकता व्हावी या उद्देशाने लोणावळा ग्रामीण पोलीस आणि पवना पोलीस मदत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ रोटरी क्लब ऑफ मावळच्या उपाध्यक्षा रो. रेश्मा फडतरे, प्रकल्प प्रमुख रो. राजेंद्र दळवी, व सदस्य रो. सुनील पवार, रो.Adv. दीपक चव्हाण, रो.निलेश गराडे, स्मिता पवार,माया दळवी,नेहा गराडे, विस्तार अधिकारी शोभा वाहिले, प्राचार्य भाऊसाहेब आगळणे, दत्तात्रय कराळे,मुख्याध्यापक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार विजय गाले,जय पवार, विजय पवार,सजन बोहरा, शक्ती झवेरी यांच्यासह पोलीस पाटील सुमारे 1000 विद्यार्थिनी पालक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना रेश्मा फडतरे म्हणाल्या की मुलींना गुड टच- बॅड टच याबाबत आई किंवा घरातील महिलांनी पूर्ण जाणीव करून द्यावी, मुलींना घडणाऱ्या अत्याचार व लैंगिक शोषणापासून जागृत करावे. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ म्हणाले पालकांनी मुलींबरोबर संवाद साधून समाजात वावरताना चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी याची जाणीव करून द्यावी तसेच काही चुकीच्या घटना आपल्या निदर्शनास आल्यास त्वरित कोणालाही न घाबरता जवळच्या पोलीस ठाण्याला आपल्या मदतीसाठी कळवावे.
पवना विद्यामंदिर,संकल्प इंग्लिश स्कूल,सरुबाई दळवी,जुनिअर कॉलेज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळसे,काले कॉलनी, ढालेवाडी येथील सुमारे 1000 विद्यार्थीनी व्याख्यानाला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकल्प इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी केले. याप्रसंगी रोटरी क्लबचे सदस्य रो Adv. दीपक चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.तर आभार भरत काळे यांनी मानले कार्यक्रमाचे आयोजन पावना पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवालदार विजय गाले,जय पवार, तसेच रोटरी क्लबचे सदस्य व प्रकल्प प्रमुख रो. राजेंद्र दळवी आणि पवना विद्या मंदिर व संकल्प इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने करण्यात आले होते.