दीड दिवसाच्या गणरायाला पवनानगर परीसरामध्ये वाजत गाजत भावपुर्ण निरोप
मंगलमय वातावरणामध्ये दीड दिवसाच्या गणरायाला पवनानगर परीसरामध्ये वाजत गाजत भावपुर्ण निरोप देण्यात आला पवनानगर परिसरामध्ये गणरायाचे मोठ्या आनंद आणि उत्साहामध्ये स्वागत करण्यात आले होते परंतु ग्रामिण भागामध्ये गावातील बऱयाच घरामध्ये गणरायाची भक्ती व सेवा करता यावी म्हणुन दिड दिवसाचा गणपती बसवला जातो आज अनेक गावामध्ये या दिड दिवसाच्या गणरायाला ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत निरोप देण्यात आला. शिवली,ठाकुरसाई,काले,पवनानगर,ब्राम्हणोली या गावातील नागरिकांनी पवना धरणाच्या काठावर वाजत गाजत नेऊन गणपतीचे विसर्जन करण्यात आले तर कोथुर्णे,येळसे,शिवली या गावातील नागरिकांनी पवना नदीच्या तीरावर विसर्जन केले. यामध्ये लहान मुलांसह तरूण व मोठ्या नागरिकांना मिरवणुकीत सहभाग घेतला होता. या परिसरातील अनेक गांवामध्ये ढोल लेझीम पथके आहेत या ढोलांना पुणे मुंबई,ठाणे,कल्याण या भागातुन गणपती विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी असते या ढोलामध्ये गावातील अनेक तरूण सहभागी असतात त्यामुळे मिरवणुकित तरूणांची संख्या कमी जाणवत होती.