श्री गणेश तरुण मंडळ ( मानाचा पाचवा गणपती ) गणपती चौक तळेगाव दाभाडे आयोजित व स्व. गणपतराव पंढरीनाथ शिंदे स्मृती भव्य लोकनृत्य स्पर्धेत नवीन समर्थ विद्यामंदिर प्रथम
तळेगाव दाभाडे नगरीतील मानाचा पाचवा गणपती असलेल्या श्री गणेश तरुण मंडळ आयोजित स्व. गणपतराव पंढरीनाथ शिंदे स्मृती भव्य लोकनृत्य स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते.यावेळी पंचक्रोशीतील शाळांनी या उपक्रमास उत्सुर्त असा प्रतिसाद दिला.
स्पर्धेचे उद्घाटन श्री राजू शंकरराव शिंदे यांनी केलं. या वर्षी २६ शाळांचा सहभाग असून जवळपास 550 विद्यार्थी सहभागी झाले होते. श्री राजू शंकरराव शिंदे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व कौतुक केले. मंडळाचे अध्यक्ष श्री स्वप्निल गुप्ते आणि उपाध्यक्ष श्री. प्रथमेश भालेराव यांच्याबरोबर सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे नेटके आयोजन केले.
सर्व स्पर्धकांनी अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये आपले स्पर्धेचे सादरीकरण केले.
सांस्कृतिक प्रमुख अवधूत टोंगळे यांसह यश झोडगे रोहन मराठे साहिल गुप्ते ॐकार मेढी वैष्णवी आंबिकर मुक्ता भावसार कल्याणी काळे सानिका टकले प्रणव लऊळकर कुणाल कुलकर्णी शिवानी कर्वे शुभम फाकटकर प्रशांत खेरडेकर आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले.
*निकाल पुढीलप्रमाणे* :-
बालवाडी गट
प्रथम क्रमांक :- पैसाफंड प्राथमिक शाळा अ
द्वितीय क्रमांक :- पैसाफंड प्राथमिक शाळा ब
उत्तेजनार्थ मामासाहेब खांडगे
पहिली ते चौथी गट
प्रथम क्रमांक :- आदर्श विद्या मंदिर
द्वितीय क्रमांक :- माऊंट सेंट ॲण्ड शाळा
उत्तेजनार्थ :- पैसाफंड शाळा
पाचवी ते सातवी गट
प्रथम क्रमांक :- नवीन समर्थ विद्यामंदिर
द्वितीय क्रमांक :- आदर्श विद्यामंदिर
उत्तेजनार्थ :- सरस्वती विद्या मंदिर
विशेष ३ पारितोषिक :-
प्रथम :- मामासाहेब खांडगे शाळा
द्वितीय :- स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल
तृतीय :- हाय व्हिजन स्कूल
मा. राज्यमंत्री श्री बाळासाहेब भेगडे यांच्या वतीने विशेष पारितोषिक :- ज्ञानयोग शाळा चाकण
याप्रसंगी स्व इंदुबाई शंकरराव शिंदे आणि स्व बबनराव धर्माजी गरुड यांच्या स्मृतिप्रत्यर्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले. परीक्षक म्हणून सौ पूर्वा भंडारे आणि तेजस्विनी गांधी कुलकर्णी यांनी काम पहिले.
मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री दत्तात्रय बळवंत मेढी आणि श्री सतीश महादेव संभूस संगीत साधना मंडळाचे श्री संजय गरुड उपस्थित होते.
यावेळी श्री गणेश तरुण मंडळाचे कार्यकर्ते श्री राहुल सतीश संभूस यांनी हॉंगकॉंग या देशातून वरिष्ठ गटातील जागतिक क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल मंडळाच्या वतीने श्री राहुल संभूस आणि सौ मैत्रयी राहुल संभूस यांचा सत्कार करण्यात आला.
बक्षीस समारंभानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.