रोटरी सिटीचे आरोग्य क्षेत्रामध्ये उत्तम कार्य,
डॉ दर्पण महेशगौरी
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी चे आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे कार्य आहे असे उद्गार भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दर्पण महेश गौरी यांनी जय बजरंग तरुण मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या भव्य मोफत आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिराच्या प्रसंगी केले. जय बजरंग तरुण मंडळ करत असलेल्या कार्याची माहिती डॉ दर्पण महेशगौरी यांनी घेतली व मंडळ करत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
रोटरी सिटीने पुढील काळामध्ये मोफत नेत्ररोग व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करावे त्यास भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय पूर्णपणे मोफत स्वरूपात सहकार्य करेल असे डॉ दर्पण महेशगोरी यांनी सांगितले.
भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालय हे आम्हास नेहमी सहकार्य करत असते त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी त्यांचे आभार मानले व जय बजरंग तरुण मंडळास सुवर्णा महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अध्यक्ष मुकेश गुंदेशा,ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशकाका जवेरी,जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष हितेश राठोड,राजू शहा,संजय अमृतलाल, समीर परमार,रोटरी सिटीचे भगवान शिंदे,दिलीप पारेख,संतोष परदेशी,प्रशांत ताये,व बसप्पा भंडारी हे उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व जैन सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जय बजरंग तरुण मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयाचे सहकार्याने भव्य मोफत आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या ठिकाणी 95 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला काही जणांचे एक्स-रे व इतर मोफत चाचण्यांसाठी त्यांना भाऊसाहेब सरदेसाई रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले संपूर्ण शिबिर हे मोफत घेण्यात आले.
या ठिकाणी विविध प्रकारच्या रुग्णांना औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 32 जणांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे नियोजन प्रकल्प प्रमुख विनोद राठोड व सह प्रकल्प प्रमुख संतोष लोणकर,पंकज गुंदेशा,विनोद लोणारी,अविनाश शेडे,सतीश राठोड,दीपक नळे व सचिन झव्हेरी यांनी उत्कृष्ट असे नियोजन केले.