श्री मरिमाता देवी नवरात्र उत्सव २०२४
आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त नाणोलीत 39 जणांचे रक्तदान
श्री मरिमाता देवी देवस्थान नाणोली तर्फे चाकण यांच्या वतीने मावळ तालुक्याचे लोकप्रिय, कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर राबविण्यात आले. यात एकूण ३९ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. या अभिनव उपक्रमाची संकल्पना अंकुश शिंदे, संकेत जगताप यांची होती.
अनिकेत जगताप, सुरेश शिंदे, रमेश चव्हाण, दीपक शिंदे, विनोद शिंदे, शंकर कोंडे, सूरज शिंदे, गणेश जगताप, सागर आल्हाट, अजय शिंदे, प्रतिक जगताप, ओंकार बोराडे, सोमनाथ मराठे, शुभम काळे, सार्थक मराठे, ऋतिक जगताप, साईनाथ मराठे , साईनाथ मोईकर, अभि शिंदे, आदिनाथ लोंढे, आर्यन भोसले, किरण लोंढे, अभिषेक बोराडे, सुमेध शिंदे, सुनिल शेलार, दत्ता कोंडे, दत्ता चव्हाण या कार्यकर्त्यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
विलास जगताप, ज्ञानेश्वर शिंदे, प्रितेश आल्हाट, वैभव काळे, अक्षय लोंढे, विजय शिंदे, अक्षय टिळेकर, संगिता जगताप, सरस्वती लोंढे, पुजा चव्हाण, माया मखामले, मानसी बोराडे, प्रांजल मखामले, प्रिया लोंढे यांचे रक्तदान शिबिराच्या पूर्ततेसाठी सहकार्य लाभले.
गेल्या वर्षी मंडळाच्या वतीने, आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त खेळ रंगला पैठणीचा, किल्ले स्पर्धा, रक्तदान शिबीर, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध, स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.