कुंभारवाडा, तळेगाव दाभाडे येथील परिसराचे श्री संत गोरोबाकाका नगर असे नामकरण करण्यात यावे
मुख्याधिकारी, तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांना केली लेखी मागणी
तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी श्री. विजयकुमार सरनाईक यांची कुंभार समाज बांधवांनी भेट घेतली. सदर भेटी दरम्यान तळेगाव दाभाडे येथील कुंभार वाडा या परिसराचे श्री संत गोरोबाकाका नगर असे नामकरण करण्यात यावे असे लेखी निवेदन श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री कैलास रघुनाथ दरेकर व खजिनदार श्री दिनेश रमेश दरेकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.
सदर निवेदन वाचून त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल, असे मुख्याधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.
निवेदन देताना श्री संत गोरोबाकाका विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी मा. अध्यक्ष श्री नामदेव कुंडलिक दरेकर, श्री दशरथ महादू दरेकर, श्री गणेश विठ्ठल दरेकर, श्री गौरव मारुती दरेकर, श्री दिनेश रमेश दरेकर, कु. प्रणव निवृत्ती दरेकर, कु. अथर्व नवनाथ दरेकर आदी समाज बांधव उपस्थित होते.