श्री डोळसनाथ उत्सव समितीच्या अध्यक्षपदी अविष्कार अशोक (अंकल) भेगडे यांची निवड
तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी श्री.अविष्कार अशोक (अंकल) भेगडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये अविष्कार भेगडे यांची निवड करण्यात आली. यावर्षी येत्या ३० मार्च रोजी गुढीपाडवा येत असून या निमित्त होणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक व विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी संयोजन समिती निवड करण्यात आली असून कार्याध्यक्ष पदी प्रणव दाभाडे, खजिनदार पदी शुभम लांडे, सरचिटणीस पदी अजय पवार, प्रसिद्धी प्रमुख अभिषेक बुटे यांना संधी देण्यात आलेली आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणाले की, या उत्सवाला असलेल्या ऐतिहासिक परंपरेला अनुसरून आणि आधुनिक बदलांनुसार उत्सव साजरा करण्याचा मी आणि माझे सहकारी नक्कीच प्रयत्न करतील. आपल्याला मिळालेल्या सर्व जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडून सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. सर्व प्रमुख पदाधिकारी व जेष्ठ मंडळी यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले.