टाकवे बुद्रुक – येथील ग्रामपंचायत मार्फत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी 20 लाख रुपये निधी उपलब्ध आहे परंतु जागे अभावी हा प्रकल्प रखडला असल्याने या प्रकल्पासाठी कुणी जागा देत जागा अशी म्हणण्याची वेळ ग्रामपंचायतींवर आली आहे
सदर प्रकल्पासाठी एकुण 20 गुंठे जागेची आवश्यकता आहे या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनची नुकतीच बैठक संपन्न झाली यामध्ये ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मतकर यांनी उपलब्ध असलेल्या पर्यायी गायरान जागा बाबत गावातील नागरिकांना माहिती दिली परंतु ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहेत त्या परिसरात राहत असलेल्या स्थानिक नागरिकांनी प्रकल्प करण्यास बैठकीत तीव्र विरोध दर्शविला असल्याने वनविभागाची टाकवे गावालगत असलेल्या जागेच्या मागणी बाबत पत्रव्यवहार करुन जागा मिळण्यासाठी पुढील दिवसांमध्ये प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी. ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब मतकर सरपंच सुवर्णा असवले,उपसरपंच प्रतिक्षा जाधव,मा.सरपंच भुषण असवले,मा.उपसरपंच अविनाश असवले, परशुराम मालपोटे,सदस्या आशा मदगे उपस्थितीत होत्या.
“सदर कचरा व्यवस्थापन प्रकल्प करण्यासाठी बेलज च्या जागेचा विचार करण्यात आला होता परंतु स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे प्रकल्प होऊ शकला नाही आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या जागेसाठी पाठपुरावा करत आहोत”
– सुवर्णा असवले
सरपंच टाकवे ग्रुप ग्रामपंचायत
“सदर ग्रामपंचायत तीन गावे मिळुन आहे बेलज व फळणे येथे गायरान जागा उपलब्ध आहे परंतु त्या परिसरातील नागरिकांनचा प्रकल्पास तीव्र विरोध असल्याने इतर पर्यायी जागेची चाचपणी करुन प्रकल्पासाठी लवकर जागा निश्चित केली जाईल”
– बाळासाहेब मतकर
ग्रामविकास अधिकारी टाकवे