मावळ तालुका येथील कार्ला बुध्द लेणीचा सर्वांगीण विकास करावा – सूर्यकांत वाघमारे यांची अजित पवार यांच्याकडे मागणी
मावळ तालुक्यातील एकविरा देवी मंदिरा च्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे असे महाराष्ट्र शासणाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे कार्ला लेणी हि सम्राट अशोकांच्या काळात निर्माण करण्यात आलेली आहे सुमारे अडिज हजार वर्षा पूर्वी निर्माण करण्यात आलेली आहे देशविदेशातील पर्यटक अभ्यास करण्यासाठी येत असतात त्यामुळे कार्ला बुद्ध लेणीने अंतर राष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेली आहे त्यामुळे कार्ला बुद्ध लेणीचा सर्वांगिन विकास करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे एकवीरा देवी मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण करतांना कार्ला लेणी परिसर उपेक्षित आणि दुर्लक्षित राहणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासणाने घेणे अत्यंत महत्वाचे आहे म्हणून बौद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा जपण्या साठी या परिसराचा विकास होणे महत्वाचचे आहे त्याकरिता काही आवश्यक सूचना आणि मागणी समस्त बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात येत आहे त्यासुचनांचा आदर करून कार्ला बुध्द लेणीचा विकास बौद्ध कालीन पद्धतीने करावा कार्ला लेणी हि हेरिटेज म्हणून शासन दरबारी नोंद असल्याने त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आणि हस्तक्षेप करता येणार नाही याची जाणिव समस्त बौद्ध समाजाला आहे परंतु बुद्ध लेणी सोडून पायथ्यापासून ते लेणी परिसरामध्ये खालील प्रमाणे काही गोष्टींची निर्मिती करण्यात यावी .
१) भगवान बुद्धांची ५० फूट मूर्ती उभी करण्यात यावी .
२) सम्राट अशोकांनी या बुद्ध लेणीची निर्मिती केल्या मुळे सम्राट अशोकांची मूर्ती उभी करण्यात यावी . तसेच पायथ्यापासून ५० अशोक स्थभांची उभारणी करण्यात यावी
३) देशभरातून येणाऱ्या बुद्ध उपासक उपासिकां साठी निवास भवन उभे करण्यात यावे
व सुसज्ज ग्रंथालयाची उभारणी करण्यात यावे
तरी या सारख्या बौद्ध कालीन इतिहास पर्यटकांना पाहता यावा म्हणून म्युरल्स तयार करण्यात यावेत या आमच्या मुख्य मागण्या आहेत तरी या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी अशी विनती वाघमारे यांनी पत्रात केली आहे