रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी,तळेगाव दाभाडे नगर परिषद, सीआरपीएफ व रोट्रॅक्ट क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीस तळेगाव शहरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांनी हर घर तिरंगा रॅलीला जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व जे देश प्रेम दाखवले त्या प्रेमाने आणि तळेगावकरांच्या उत्स्फूर्त सहभागाने मी भारावून गेलो असे प्रतिपादन सीआरपीएफ चे उप महानिरीक्षक श्री वैभव निंबाळकर सर यांनी तिरंगा रॅली प्रसंगी काढले.गेली तीन वर्ष रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या वतीने हर घर तिरंगा रॅली सीआरपीएफ व नगरपरिषदेच्या सहकार्याने घेण्यात येते आणि तळेगाव शहरातील नागरिक यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात या सर्वांचे रोटरी सिटीचे वतीने अध्यक्ष किरण ओसवाल यांनी आभार मानले. प्रभारी मुख्याधिकारी डॉक्टर प्रवीण माने यांनी तळेगाव शहरातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे एसटी स्टँड वरून निघालेल्या या रॅलीत तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळाचे 700 विद्यार्थी सीआरपीएफ चे 600 जवान 242 बटालियनची एक तुकडी नगरपरिषद मधील कर्मचारी यांचा सुद्धा मोठा सहभाग होता. स्माईल व्यसनमुक्ती केंद्राचे विद्यार्थी आकर्षणाचा केंद्रबिंदू होते. नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळेचे वेगवेगळ्या वेशभूषा केलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. संपुर्ण तळेगाव शहरातील रस्ते देश प्रेमाने ओसांडून वाहत होते. तळेगाव शहरातील नागरिक यांनी उत्स्फूर्त असा सहभाग या हर घर तिरंगा रॅलीमध्ये नोंदवला.
एडवोकेट पु वा परांजपे विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून तिरंगा रॅली मधील जवानांना अनोखी अशी मानवंदना दिली.
तळेगाव शहरातील अनेक नागरिकांनी स्वतःहून या रॅलीमध्ये सहभागी होऊन रॅलीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली व तिरंग्यास औक्षण करण्यात आले.
मावळ तालुका भाजपचे अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे तळेगाव शहर भाजप अध्यक्ष संतोष दाभाडे विलास काळोखे,असिस्टंट गव्हर्नर दीपक फल्ले,दिलीप पारेख,मनोज ढमाले,कमलेश कार्ले,मंगेश गारोळे श्रीशैल मेंथे,सुरेश दाभाडे,राकेश ओसवाल,विनोद राठोड,संजय मेहता, धनश्री काळे,नितीन शहा,माजी नगरसेवक श्रीराम कुबेर,लक्ष्मण माने, माजी नगरसेविका शोभा भेगडे,संध्या भेगडे,शोभा परदेशी व अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन संतोष परदेशी,प्रशांत ताये,निखिल महापात्रा,प्रदीप मुंगसे,राकेश गरुड, बसप्पा भंडारी,प्रतीक मेहता,अभिषेक पांडे,समर्थ रेवनशेत्ते,साक्षी जयकर,साची अगरवाल,रामनाथ कलावडे यांनी केले.
प्रकल्प प्रमुख प्रदीप टेकवडे यांनी सूत्रसंचालन केले तर भगवान शिंदे यांनी आभार मानले.