78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख अतिथी लायन्स क्लबचे अध्यक्ष मा. श्री अनिल तानकर सर उपस्थित होते. शाळेचे संस्थापक श्री. चंद्रकांत काकडे, अध्यक्ष श्री. संदीप काकडे, संस्थेचे सचिव श्री. प्रशांत शहा,लायन्स क्लबचे इतर मान्यवर, तळेगाव नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ. मंगलताई काकडे,खजिनदार सौ.गौरी काकडे, संचालिका सौ. सुप्रिया काकडे,संचालिका सौ. सोनल काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.मीना अय्यर उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत गायले. शाळेतील विद्यार्थिनींनी झेंडा गीत, राज्य गीत व देशभक्तीपर गीत सादर केले.तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी जय जवान जय किसान, वंदे मातरम,भारत माता की जय अशा घोषणा देत शाळेचे मैदान दुमदुमून टाकले. प्रमुख पाहुणे मा. श्री अनिल तानकर सरांनी आपल्या मनोगतातून सांगितले, की आपण भाग्यशाली आहोत.या देशाचे आपण नागरिक आहोत. तसेच या अमृत महोत्सवी दिवसाचे आपण साक्षीदार आहोत . तसेच विद्यार्थ्यांना संदेश दिला, की थोर विचारवंतांच्या चारित्र्याचे वाचन करावे. त्यांचे विचार आपल्या देशाला प्रेरक ठरले आहेत . त्यांच्या विचारांनी वैयक्तिक आयुष्य व राष्ट्र घडवण्यात त्याचा नक्कीच फायदा होईल. तसेच संचालिका सौ.सोनल काकडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका आपल्या मनोगतात म्हणाल्या, की ‘विकसित भारत’ ह्या अब्दुल कलामांच्या स्वप्नाकडे आपण वाटचाल करत आहोत व लवकरच हे स्वप्न 2030 पर्यंत साकार होईल व विकसित देशाच्या यादीत आपला देश असेल यासाठी प्रत्येक नागरिकांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. अर्थव्यवस्थेत भारताने दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकापर्यंत झेप घेतली आहे. तसेच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी प्रेरित केले व आपल्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेवर उत्तम प्रभुत्व निर्माण केले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शाळेतील पर्यवेक्षिका,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा गायकवाड व कु. श्रेया भसे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.