स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात रोटरी सिटीचा आगळावेगळा रक्षाबंधन उत्सव.
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्या वतीने स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात आगळावेगळा असा रक्षाबंधनाचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला.
नशेच्या आहारी गेलेले अनेक रुग्ण या व्यसनमुक्ती केंद्रा मध्ये उपचार घेत आहेत त्यांना रक्षाबंधनाची आगळीवेगळी भेट राखी बांधून रोटरी सिटीच्या महिला सदस्यांकडून देण्यात आली.
शिरगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी रुग्णांना मार्गदर्शन करताना लवकरात लवकर आपण बरे व्हा नशा मुक्त व्हा व आपापल्या घरी जाऊन नवीन आयुष्याची सुरुवात करा असे आवाहन केले याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी मॅडम उपस्थित होत्या. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष किरण ओसवाल यांनी या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या घरच्यांबरोबर नाही आहात परंतु लवकरात लवकर या ठिकाणी उपचार घेऊन नशेतून मुक्त होऊन भाऊबीज तुम्ही तुमच्या घरी बहिणी सोबत मोठ्या थाटामाटात साजरी करावी.
आज रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला वचन देण्यात यावे भाऊबीज ही तुझ्याबरोबर नशेतून मुक्त होऊन मोठ्या थाटामाटात साजरी करेल असे असे वचन आजच्या दिवशी बहिणीला द्यावे असे आवाहन अध्यक्ष किरण असल्याने केले. स्माईल व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने अध्यक्ष हर्षल पंडित यांनी सर्वांचे स्वागत केले व व्यसनमुक्ती केंद्राची माहिती दिली.
रुग्णांच्या घरून आलेले भेटकार्ड व त्यामध्ये बहिण भावाचे असलेले फोटो पाहून रुग्णांची मने हेलावून गेली. रोटरी सिटीच्या फर्स्ट लेडी अनिता ओसवाल,प्रकल्प प्रमुख सुनंदा वाघमारे,शरयू देवळे,डॉ.धनश्री काळे,सौ पंडित,सौ कदमताई असिस्टंट गव्हर्नर दीपक फल्ले,संतोष परदेशी,राकेश ओसवाल,विश्वास कदम
हे उपस्थित होते उपाध्यक्ष भगवान शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.