आजचा विद्यार्थी उद्याचा देश घडवेल – किरण ओसवाल
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी च्या वतीने 78 व्या स्वतंत्रदिना निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुल या ठिकाणी संपन्न झाला.
आजचा विद्यार्थी उद्या देश घडवेल आणि याच विद्यार्थ्यांमध्ये उद्याच्या देशाचे उज्वल भवितव्य आणि भविष्य आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटी चे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी याप्रसंगी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुल मध्ये किरण ओसवाल यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेमध्ये उज्वल यश प्राप्त केलेल्या कुमार उज्वल सुभाष राठोड याचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलचे अध्यक्ष सुरेश दाभाडे यांनी सावरकर गुरुकुल विषयी माहिती देऊन रोटरी सिटी नेहमीच सावरकर गुरुकुल या ठिकाणी चांगले उपक्रम घेत असते व सावरकर गुरुकुलला मदतीचा हातभार लावत असते याबद्दल आभार व्यक्त केले. या प्रसंगी
रोटरेक्ट अध्यक्ष रोशनी ओसवाल,भगवान शिंदे,दिलीप पारेख,दादासाहेब उरे,असिस्टंट गव्हर्नर दीपक फल्ले, माजी अध्यक्ष सुरेश शेंडे,संतोष परदेशी, विनोद राठोड,राकेश ओसवाल,संजय मेहता,नितीन शाह,प्रसाद पादीर,प्रकाश लोणकर,संजय जाधव,हिम्मत पुरोहित,सुनील महाजन रोटरेक्ट क्लबचे पल्लवी विसपुते,हर्षद जवेरी,अभिषेक पांडे हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सर्व मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन रितेश फाकटकर,प्रदीप मुंगसे,निखिल महापात्रा,मधुकर गुरव,विकी बेल्हेकर,संग्राम जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे तर आभार प्रदर्शन सतीश राऊत यांनी केले