रोटरी चॅलेंजर्सचा अनोखा रक्षाबंधन सोहळा!
रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चॅलेंजर्सच्या वतीने तळेगाव दाभाडे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसमवेत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलात महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातील शेतमजूर, विट कामगार, आदिवासी, कामगार अशा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलांचं मोफत संगोपन केलं जातं अशा विद्यार्थ्यांना रोटरी चॅलेंजर्सच्या वतीने राखी पौर्णिमेच्या निमित्ताने राखी बांधून त्यांच्या समवेत स्नेहभोजन चॅलेंजर्स क्लब व पाहुण्यांनी केले. विद्यार्थ्यांनी जिद्द चिकाटी जिज्ञासा यांच्या जोरावर खूप अभ्यास करून आपल्या परिस्थितीवर मात करावी व खूप मोठे व्हावे असे प्रतिपादन रोटरी चॅलेंजर्सच्या अध्यक्षा ज्योती राजिवडे यांनी करताना नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन या सणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. विद्यार्थ्यांना भारतीय सण आणि उत्सव यांची पौराणिक व ऐतिहासिक माहिती सांगून त्यांच्यात सांस्कृतिक वारसा रोटरी सारख्या संस्था निर्माण करतात असे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील आगळे यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाद्वारे गुरुकुलाचे माहिती प्रदीप टेकवडे यांनी विशद केली. सर्व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत प्रकल्प प्रमुख उमा काशीकर सहप्रकल्प प्रमुख संगीता शिळीमकर यांनी केले. मान्यवर पाहुण्यांना चॅलेंजर्सच्या अध्यक्षा ज्योती राजिवडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले सदर प्रसंगी तळेगाव येथील करंडे क्लासेसच्या वतीने गुरुकुलास आरोग्यविषयक साहित्य स्वरूपात मदत करण्यात आली.
लक्ष्मण पुजारी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघा) मुग्धा जोगळेकर,वृषाली करंडे,महेश दुधाने, करुणांजली मतिमंद शाळेच्या सिस्टर जया मेकवान, ओलिविया फर्नांडिस उद्योजक भारत राजिवडे, दादा शिरोडकर इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार मनोज जैन यांनी मानले गुरुकुलचे विद्यार्थी, करंडे क्लासेसचे विद्यार्थी, करुणांजली मतिमंद शाळेच्या विद्यार्थिनी, रोटरी चॅलेंजर्सचे सदस्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते.