आमदार शेळके यांच्या कामावर नागरिक समाधानी – प्रवीण झेंडे
आमदार सुनिल शेळके यांनी त्यांच्या कार्यकाळात आजपर्यंतचा सर्वाधिक म्हणजे सुमारे अडीच कोटींचा विकास निधी उपलब्ध करून दिल्याने झेंडे मळ्यातील अनेक प्रलंबित विकास कामे मार्गी लागली आहेत,अशी प्रतिक्रिया देहूरोेड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष प्रवीण झेंडे यांनी दिली.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील झेंडेमळा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार सुनिल शेळके यांच्या शुभहस्ते (बुधवारी दि.९) झाले. त्यावेळी ते बोलत होते. या समारंभास ज्येष्ठ नेते अंकुश झेंडे, मल्हारी झेंडे, प्रकाश झेंडे, संतोष झेंडे, ज्ञानेश्वर झेंडे, दत्तात्रय झेंडे, प्रदीप झेंडे, अशोक झेंडे, नंदूभाऊ काळोखे, कृष्णा दाभोळे, विक्रम झेंडे, मारुती झेंडे, किरण झेंडे, रामभाऊ हगवणे, महेंद्र काळोखे, विवेक काळोखे, रोहित काळोखे, मयूर टिळेकर, गणेश हगवणे, सचिन हगवणे, विशाल झेंडे, शीतल हगवणे, राजश्री राऊत आदी मान्यवर तसेच आजी-माजी पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
प्रवीण झेंडे म्हणाले की, कॅन्टोन्मेंटच्या हद्दीत असलेला आमचा झेंडेमळा विकासापासून वंचित होता. बोर्डाकडून मिळणारा निधी अल्प प्रमाणात असल्यामुळे कामे करताना अडचणी येत असत. रस्त्यासारख्या मुलभुत सुविधेसाठी आम्हाला संघर्ष करावा लागला, परंतु आमदारांनी अडीच कोटी इतका भरीव विकासनिधी दिल्याने झेंडे मळ्यातील सर्व नागरिक आमदार सुनिल शेळके यांच्या कामावर नक्कीच समाधानी आहेत.
‘विकासापासून वंचित राहिलेल्या भागासाठी निधी उपलब्ध करु शकलो, याचे समाधान आहे, या शब्दांत आमदार शेळके यांनी भावना व्यक्त केल्या. या विकास निधीच्या सहाय्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्ते व इतर महत्त्वाच्या कामांना गती मिळाली. विकासाचे हे पाऊल झेंडे मळ्याच्या सामाजिक सुविधांच्या विस्ताराला गती देणारे ठरले आहे, असे ते म्हणाले.
झेंडे मळ्याप्रमाणेच देहूरोड परिसरातील विविध भागांमध्ये आमदार शेळके यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले.