पवित्र श्रावण सोमवारच्या औचित्याने मावळाचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान जांभवली, श्री क्षेत्र घोरावडेश्वर देवस्थान घोरावडी, श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान देहूगाव येथे रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच यांच्या तर्फे फराळ वाटप करण्यात आले.
हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात व्रत-वैकल्ये आणि उपवास धरणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन , दर्शनार्थी भाविकांच्या सोयीसाठी हे फराळ वाटप आयोजित केल्याचे रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
याप्रसंगी घोरावडेश्वर येथे प्रदेश भाजपा युवा मोर्चा सचिव मा.रघुवीर दादा शेलार, उद्योजक मा.श्रीकृष्ण भेगडे, उद्योजक मा.महेद्रभाऊ सुतार,उद्योजक मा.अभिजीत उर्फ टायगर भेगडे, उद्योजक मा.गोविंद भाऊ अल्लाट , मा.योगेश भाऊ शेलार ,कोंडेश्वर मंदिर जांभवली येथे मावळ भाजपा युवा वॉरियर्स अध्यक्ष कु. प्रणेश नेवाळे व त्यांचे सर्व युवा सहकारी उपस्थित होते तर श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देहूगाव येथे भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस संतोष भाऊ हागवणे, उद्योजक राहुल भेगडे, सचिन काळोखे,उद्योजक मयूर शेलार ,सागर मुसुडगे,रायबा मोरे आदी प्रमुख उपस्थित होते!