तळेगाव दाभाडे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख मा.श्री. रवींद्रआप्पा भेगडे,तळेगाव दाभाडे शहराचे अध्यक्ष श्री संतोषभाऊ दाभाडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज तळेगाव दाभाडे शहरांमध्ये मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले.
भारतीय जनता पार्टी कार्यालय , मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे , मराठा क्रांती चौक तळेगाव दाभाडे (स्टेशन) आणि युनिक हॉस्पिटल जवळ , मनोहर नगर येथे नवीन मतदार नावनोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. मंगळवार दि.१३ ऑगस्ट ते शुक्रवार दि.१६ ऑगस्ट पर्यंत हे अभियान सुरू राहणार असून , या अंतर्गत नवीन मतदार नावनोंदणी – फॉर्म ६ , मतदार यादीमधून नाव वगळ्यासाठी – फॉर्म ७ , मतदार यादीतील नाव दुरुस्तीसाठी फॉर्म ८ , मतदार यादीतील नाव दुरुस्तीसाठी – फॉर्म ८ अ इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
जास्तीत जास्त मतदारांनी आपली नाव नोंदणी करून लोकशाही सशक्तिकरणासाठी हातभार लावावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
याप्रसंगी , तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष श्री संतोषभाऊ दाभाडे, युवा उद्योजक श्री.श्रीकृष्ण आण्णासाहेब भेगडे ,भाजपा मावळ तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष श्री.अभिजीतभाऊ नाटक,तळेगाव दाभाडे शहर भाजपा सरचिटणीस श्री.स्वप्निलजी भेगडे,तनुजाताई दाभाडे, अतीशजी रावळे, शिवांकुर खेर,भाजपा मावळ तालुका युवा वॉरियर्स अध्यक्ष कु.प्रणेशभाऊ नेवाळे,प्रसिद्धीप्रमुख अमितजी भागीवंत, उपाध्यक्ष सतीशजी पारगे,मृदालाताई भावे,उद्योजक श्री.मंगेशभाऊ थोरवे,ज्येष्ठ आघाडी अध्यक्ष अनिलजी वेदपाठक,उत्तर भारतीय महिला आघाडी अध्यक्ष पौर्णिमाजी उपाध्याय,चिटणीस संध्याताई जाधव,स्मिताताई पोरे, विनोदजी उपाध्याय आदी उपस्थित होते.