वडगाव नगरपंचायतचा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७७वा वर्धापन दिन गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळी ७ वा. ४५ मि. नगरपंचायत प्रांगणात माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासन डॉ. प्रविण लक्ष्मण निकम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संप्पन झाला यावेळी शहरातील नागरिक, मान्यवर, शालेय विद्यार्थी,अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष यांच्या समवेत राष्ट्रगीत, राज्यगीत, तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच शहरातील शूरवीर माजी सैनिक यांचा नगरपंचायत च्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या “हर घर तिरंगा” अंतर्गत श्रीमंत महादजी शिंदे उद्यान येथील कोणशीलेचे पुजन, पुष्पहार अर्पण करून देशासाठी बलिदान दिलेल्या वीर जावनांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
तसेच नागरिकांमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाची ओळख म्हणून व तसेच नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे, राष्ट्रध्वजाबद्दल जागृती वाढवणे च्या अनुषंगाने श्रीमंत महादजी शिंदे उद्यान ते मिलिंद नगर ते मातोश्री हॉस्पिटल चौक ते नगरपंचायत पूर्वेकडील कमान ते मोरया कॉलनी ते तळेगाव चौक, पुणे मुंबई हायवे ते तहसील ऑफिस ते नगरपंचायत कार्यालय या ठिकाणाहून तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती. सदर उपक्रमास सुमारे 300 नागरिकांचा सहभाग होता.
त्याच प्रमाणे दि. १३ व १४ ऑगस्ट रोजी “हर घर तिरंगा” अंतर्गत नगरपंचायत प्रारंगणात ध्वजारोहण करण्यात आले, सेल्फी विथ तिरंगा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा दोड, तिरंगा प्रभात फेरी, तिरंगा ध्वज वाटप, तिरंगा कॅनव्हास आदी उपक्रम घेण्यात आले होते.
सदर उपक्रम शून्य कचरा निर्मितीच्या अनुषंगाने राबविण्यात आले यामध्ये सर्व झेंडे कापडी वापरण्यात आले, कागदी पताका, फुले, हार यांचा वापर करण्यात आला होता कोणत्याही प्रकारचे एकलवापर प्लास्टिक किंवा आधी वस्तूंचा वापर करण्यात आला नाही